🕒 1 min read
मुंबई:- शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
भाजपने मात्र या मुद्द्यावरून संजय राऊत यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. मी ईडी प्रवक्ता नाही, कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही. चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे कारण नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता.
दरम्यान, थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकारांशी थोडक्यात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला. मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल, असा टोला त्यांनी लगावला. हे पूर्णपणे राजकारण सुरू असल्याचं देखील ते पुढे म्हणाले. दरम्यान, मी या प्रकरणी आज दुपारी दोन वाजता शिवसेवा भवनात पत्रकार परिषद घेणार आहे असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांकडे यूपीएचं नेतृत्व?; पी चिदंबरम म्हणाले…
- ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी अब्दुल सत्तारांच्या गावागावात बैठका सुरु
- युपीएच्या अध्यक्षपदाविषयी शरद पवारांनी केले मोठे विधान
- नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज : अजित पवार
- अखेर अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार, जानेवारीत आंदोलन करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
