Share

शरद पवारांकडे यूपीएचं नेतृत्व?; पी चिदंबरम म्हणाले…

Published On: 

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए)अध्यक्षपद सोपवण्यासंबंधीच्या चर्चाना सध्या उधाण आले आहे आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील सध्याची परिस्थिती पाहता शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावे अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीदेखील पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पी चिदंबरम यांनी शरद पवार यांची यूपीए अध्यक्ष होण्याची इच्छा असेल असं मला वाटत नसल्याचं म्हटलं आहे. हे काही पंतप्रधानपद नाही आणि स्वत: शरद पवार यांची यूपीए अध्यक्ष म्हणून जाहीर केलं जावं अशी इच्छा नसावी असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत संजय राऊत यांचा विधानाचा समाचार घेतला आहे.‘आम्ही शरद पवार यांचा आदर करतो. ते देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. पवार यांच्याविषयी काही बोलणे मला योग्य वाटत नाही. आपण यूपीएचे नेतृत्व करणार असल्याच्या वृत्ताचा दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच इन्कार केलेला आहे. यूपीएचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केलेले आहे असं चव्हाण म्हणाले.

शिवसेनेशी आमची आघाडी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असून, राज्यातील आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर झाली आहे. किमान समान कार्यक्रम प्रमाण मानून काँग्रेसने आघाडीचा महाराष्ट्रापुरता निर्णय घेतलेला आहे. शिवसेना अजूनही यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा सल्ला शिवसेनेने देणे उचित नाही, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना फटकारले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!