मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षी पासून राज्यासह देशभरात कोरोना रोगाने माजवलेल्या हाहाकारामुळे शैक्षणिक क्षेत्रला देखील मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, दरवर्षी मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या राज्य बोर्डाच्या परीक्षा एप्रिल-मे मध्ये घेण्याचे बोर्डाने जाहीर केले होते. मात्र, कोरोनाच्या थैमानामुळे दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते. सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने देखील परीक्षा रद्द करण्यावरून राज्य सरकारला झापलं होतं.
मात्र, राज्य सरकार दहावीच्या परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. आता दहावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याबाबतचे निकष व अकरावी प्रवेश कशा पद्धतीने होणार याबाबतचा जीआर राज्य सरकार काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ‘बोर्ड परीक्षा सुरक्षित वातावरणामध्ये घेता येऊ शकतात. मात्र, राज्य सरकारला त्या घेता येत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. तसेच, ‘दहावी किंवा बारावीच्या परीक्षा या महत्वाच्या असतात. बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यास तो विद्यार्थ्यांचं नुकसान करणारा असेल,’ असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सामंतांना माहितीये भाजपचं पुन्हा येणार, त्यामुळेच ते…’; निलेश राणेंच्या व्हिडीओने खळबळ
- ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले, तरच लॉकडाऊन उठू शकतो : अस्लम शेख
- अबब…! लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानी दर तासाला कमावतायत ‘इतका’ बक्कळ पैसा
- ७ मे चा निर्णय हा असंवैधानिक; ‘त्या’ जीआरवरून काँग्रेसचा राज्य सरकारला घरचा आहेर
- सकारात्मक : पुण्यात सलग सहाव्या दिवशी नव्या कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या आत


