Share

वेळ आली तर मोदी ताज महाल पण विकतील : ममता बॅनर्जी

Published On: 

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.

तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसकडूनही आपला गड राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यातील ब्रिगेड मैदानात सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

ममता बॅनर्जी यांनी सिलिगुडीमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात पदयात्रा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला. “केंद्र सरकारनं दिल्ली विकली, डिफेन्स, एअर इंडिया, बीएसएनएल अशा अनेक संस्थांना विकलं. उद्या वेळ आली तर ते ताजमहालही विकतील. ते सोनार बांगला बनवू असं म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरील स्टेडियमही त्यांनी आपल्या नावे करून घतलं. कोरोना काळात मी फिरत होत पण मोदी कुठे होते? देशात एकच सिंडिकेट आहे आणि ते म्हणजे मोदी व अमित शाह. हे सिंडिकेट भाजपचंही ऐकत नाहीत. उज्ज्वला योजनेवर कॅगनं ठपका ठेवला आहे आणि त्यात गैरव्यवहार झाल्याचंही सांगितलं आहे,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!