नागपूर : राज्य सरकारने वीज बिलं कमी करावं, यासाठी आज राज्यभरात भाजपकडून महावितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं आहे. भाजप कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत राज्य सरकारचा निषेध केला आहे. या आंदोलनात चंद्रशेखर बावनकुळे, आमदार देवयानी फरांदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार अतुल भातखळकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.
‘थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीस पाठविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजप तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळाला, असा दावा करत बावनकुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वत: १०० युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आश्वासन प्रत्यक्षात साकारण्यात आलं नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून आधिच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका’, अस म्हणत बावनकुळे यांनी नितीन राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. राज्य सरकारच्या या जुलमी कारभारा विरोधात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. भाजप कार्यकर्ते आंदोलन करून थांबणार नाहीत. भाजप कार्यकर्ते वीज पुरवठा खंडीत करण्यास येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अटकावह करतील’, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
- मुलीकडे एकटक पाहणाऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा
- पालकमंत्री देसाई म्हणाले, औरंगाबादची लवकरच कचरा शून्यतेकडे वाटचाल
- ‘सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेणार’
- महापालिका नोकरभरतीसाठी आयुक्त आग्रही, मुख्यमंत्र्याना केली विनंती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
