मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मुकेश अंबानींच्या घराबाहेर गाडीमध्ये ठेवलेले स्फोटकाचं प्रकरण गाजत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
एपीआय सचिन वाझे यांना पुन्हा एकदा सरकारी सेवेत घेण्यात यावे, यासाठी शिवसेनेकडून दबाव होता तसेच उद्धव ठाकरेंनी देखील फोन केला होता, असं देवेंद्र फडणवीस आज म्हणाले. तसेच सचिन वाझे आणि शिवसेनचे नजिकचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘२००८ मध्ये सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला.
काही काळ शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम केलं. सचिन वाझेंचे शिवसेनेबरोबर खूप चांगले संबंध होते. शिवसेनेच्या सक्रिय नेत्यांबरोबर त्यांचे व्यावयासिक संबंधही होते. काही कंपन्याही त्यांनी तयार केल्या. असा आरोप आज देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केला.
या सर्व आरोपांवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. पुरावे असेल तर नाव घेऊन बोलावं. त्या नेत्यांची नावं घ्या. उगाच हवेत तीर मारू नका, असं आव्हानच संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलं आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले. नावं घेऊन बोला. तुमच्याकडे पुरावा असेल, काही माहिती असेल तर ती द्या. हवेत तीर मारू नका. थेट बोला, असं आव्हानच राऊत यांनी फडणवीसांना दिलं.
वाझे हे वसुली अधिकारी होते असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरही राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणत्या राज्यात कोण वसूली करतं हे सर्वांना माहीत आहे. त्या ठिकाणी वसूली इंचार्ज कोण होतं हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोलू नये. हमाम में सब नंगे है, असं राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी बारामतीतून लोकसभा लढविणार’, महादेव जानकरांचा इरादा पक्का
- ‘आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीत राहतो की मोगलांच्या?’
- नवल! तलावातून चार क्विंटल माशांची चोरी
- डीएनए अहवालाच्या पुराव्यामुळे अत्याचारातील आरोपीला २० वर्षांची शिक्षा
- काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासमोर अडचण, कोर्टाने बजावली नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
