Share

‘मी बारामतीतून लोकसभा लढविणार’, महादेव जानकरांचा इरादा पक्का

Published On: 

बारामती : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज बुधवारी बारामती येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षांच्या भविष्यातील भूमिकांवर भाष्य केले. ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत मी बारामती, परभणी किंवा माढा या तिन्हीपैकी एका मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहे अशी घोषणा त्यांनी केली. जानकर यांनी तीनपैकी एका मतदारसंघातून आगामी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्यांचे सगळे लक्ष बारामतीवर केंद्रीत आहे. या मतदारसंघात गेली तीन दिवस ते मुक्कामी आहेत.

जानकर म्हणाले, महाराष्ट्रात फिरून मी बारामतीत मुक्कामी येत आहे. येथे सर्व लोकांनी मला भरभरून प्रेम दिले. त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. बारामतीत लक्ष घालून त्यांचे प्रश्न सोडविणार आहे. राज्यातील परभणी, जालना, हिंगोली, माढा व बारामती या पाच लोकसभा मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. या मतदारसंघातील किमान वीस आमदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्याच्या सत्ताकारणात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, अशी स्थिती आम्हाला बनवायची आहे.

राज्यातील राजकीय परिस्थितीवर ते म्हणाले की, सध्या तरी मी भाजपसोबतच आहे. पण भविष्यात जर काही गोष्टी वेगळ्या घडल्या तर सगळेच पर्याय आमच्यासमोर खुले आहेत. मी एका पक्षाचा प्रमुख असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस सर्वच पक्षांच्या प्रमुखांसोबत माझे मैत्रीचे संबंध आहेत असे सांगून भविष्यात आपण कोणासोबतही जाण्यास तयार असल्याचे संकेत जानकरांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!