मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील महत्त्वकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेचे काम अडचणीत सापडले आहे. योजनेतील जवळपास एक हजार कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना पेव फुटले आहे.
फडणवीस यांच्यासाठी ही अडचणीची गोष्ट ठरू शकते अशी चर्चा असताना आता फडणवीस यांनीच या चौकशीबाबत भाष्य केले आहे. जलयुक्त शिवार योजनेमध्ये झालेल्या साडेसहा लाख कामांपैकी 950 कामांविषयी तक्रार आहे. ही संख्या फार मोठी नाही. वास्तविक कोणत्याही कामात चूक होऊ नये. तरीही जलयुक्त शिवारच्या कामात चूक झाली असेल तर त्याची चौकशी करण्यात अडचण नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
जलयुक्त शिवार योजनेतील 900 कामांची एसीबीमार्फत चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे सरकार असताना आम्ही जलयुक्तच्या 650 कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते, या योजनेच्या संदर्भात सरकारला जी चौकशी करायची असेल ती त्यांनी निश्चितपणे करावी.
या योजनेचे काम कृषी, जलसंधारण, ग्रामविकास, लघू पाटबंधारे, जिल्हा परिषद अशा सात विभागांच्या माध्यमातून झाले. योजनेचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला जात होता आणि तेथूनच त्याचे वितरण होत होते, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती,19 तासानंतरही मदत नाही
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांची राजनाथसिंह यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा


