Share

दिल्लीच्या सीमेवरुन आंदोलकांना हटविण्याच्या याचिकेवर आज होणार सुनावणी

Published On: 

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत तर या मुद्द्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी शेतकरी आंदोलनावरून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे.

दरम्यान,शेतकऱ्यांच्या निषेधामुळे होणाऱ्या अडचणींविरोधात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांचे खंडपीठ या याचिकांवर सुनावणी घेईल. आंदोलनामुळे रस्ते रोखले जात आहेत, असे सांगत कायदा विद्यार्थी रिषभ शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत दिल्लीच्या हद्दीतून शेतकऱ्यांना हटविण्याची मागणी केली आहे.आणखी एका याचिकेत म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी निर्देश द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, काल पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील कच्छ येथील कार्यक्रमात शेतकरी आंदोलनावरून विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. शेतकऱ्यांच्या मागे राहून विरोधक सरकारवर हल्ला करत असल्याचे मोदी म्हणाले. कृषी क्षेत्रातील या सुधारणा सत्तेत असताना त्या पक्षांनाही करायच्या होत्या मात्र, त्यांना सत्तेत असताना हे जमले नाही. भाजपने सुधारणा करून दाखविल्या, असे मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!