Share

‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ नामकरण प्रस्ताव मंजूर न झाल्यास सभागृह चालू देणार नाही- भाजप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – एम / पूर्व विभागातील घाटकोपर – मानखुर्द जोडमार्ग वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावरील उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव देण्यास मंजूरी देण्याबाबत प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेवर अद्याप प्रलंबित असून जाणूनबुजून सत्ताधारी शिवसेना नामकरण प्रस्तावाबाबत दिरंगाई करत आहे. येत्या महापालिका सभेत ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ नामकरणाचा प्रस्ताव तातडीचे कामकाज क्रमांक १५१ मंजूर झाला नाही तर भारतीय जनता पक्ष सभागृह चालवू देणार नाही असा तीव्र इशारा भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर, सभागृहनेता तसेच स्थापत्य समिती अध्यक्षांना पत्राद्वारे दिला आहे.

भारतीय जनता पक्षाकडून वारंवार मागणी होऊनही महापालिकेच्या दि. ३० जुलै २०२१ रोजीच्या कार्यक्रमपत्रिकेवरील तातडीचे कामकाज क्र.१५१ – विषय एम / पूर्व विभागातील घाटकोपर – मानखुर्द जोडमार्ग वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावरील उड्डाणपुलास ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव देण्यास मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव कार्यक्रमपत्रिकेवर अद्याप प्रलंबित ठेवण्यात आला आहे. याबाबत दि. ३० जुलै २०२१ व ३१ जुलै २०२१ च्या सभा घोषित करुनही अनाकलनीय कारणासाठी सभा रद्द करण्यात आली. या उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते थाटामाटात झाले. परंतु दुर्दैवाने या उड्डाणपुलास छत्रपतींचे नामकरण मात्र, होऊ शकलेले नाही अशी टीका गटनेते शिंदे यांनी केली.

सत्ताधारी शिवसेना या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत असून त्यांना केवळ टिपू सुलतानचा कळवळा आहे. सत्ताधाऱ्यांनी दि.१२ ऑगस्ट २०२१ च्या सभेतही हा नामकरण प्रस्ताव मंजूर केला नाही. दि.१२ ऑगस्टच्या सभेत केवळ ‘ई’ विभागातील स्थायी समिती अध्यक्षांचे तातडीचे कामकाज क्र.१५३, १५४, १३२, १३३ हे विषय मंजूर करण्यात आले परंतु ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ नामकरणाचा प्रस्ताव क्र.१५१ प्रलंबित ठेवण्यात आला.

‘ई’ विभाग तातडीचे कामकाजसाठी आग्रही मागणी करणारे येथे मात्र महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपतींना विसरले की, दुसरा कोणता राजकीय डाव आहे? हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. सत्तारुढ शिवसेना महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ नामकरण प्रस्ताव मंजूर करण्याची आवश्यकता वाटत नाही हे अनाकलनीय अन आश्चर्यकारक आहे. ही छत्रपतींच्या नावावर तहयात राजकारण करणाऱ्यांसाठी अशोभनीय असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!