🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी २७०० पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. मुश्रीफ कुटुंबाने १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्यांनी केलेले आरोप मुश्रीफ यांनी फेटाळत निषेध व्यक्त केला होता. मात्र, त्यानंतर मुश्रीफ यांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी थंडी वाजून ताप आला होता. बैठक सुरू असताना ताप वाढतच असल्याचे माझ्या निदर्शनास आल्यामुळे मी तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. बॉम्बे हॉस्पिटल हे माझे नियमित तपासणीचे हॉस्पिटल आहे. डॉक्टरांनी डेंगूसदृश्य ताप असल्याचे निदान केले व त्याची साथ असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.
तसेच मुंबईतील रुग्णालयातून एक प्रसिद्धीपत्रक काढून किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला आहे. ‘माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वास्तविक माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर चुकीची खोटी तक्रार करून आरोप केलेले आहेत. तसेच त्यांनी आरओसीमधून मिळवलेली कागदपत्रे केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिलेली आहेत. यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापा, चौकशी झालेली आहे. तपास यंत्रणा ज्यावेळेस चौकशी करतील त्याचे योग्य उत्तर आम्ही देऊन त्यांना सहकार्य करूच असे पत्रकात म्हटसे आहे.
तसेच, मात्र किरीट सोमय्या यांची ही स्टंटबाजी कशासाठी? त्यांना हा अधिकार कोणी दिला? कारण त्याना एक सवयच लागली आहे की तक्रार करायची व तिथे जाऊन पर्यटन करून प्रसिद्धी मिळवायची. त्यातूनच विनाकारण बदनामी करण्याचा प्रकार करावयाचा. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्यावर प्रेम करणारे, शिळ्या कढीला ऊत आणला जात आहे. यामध्ये काळापैसा असल्याचे सिद्ध झाल्यास कोणतीही शिक्षा मी भोगीन. अन्यथा, किरीट सोमय्या यांना जन्माचीच अद्दल घडेल असा इशाराही मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
दरम्यान, सोमय्या यांनी सोमवारी (दि.२०) घोरपडे कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात संतापाची लाट असताना दौरा आखून त्यांनी कोल्हापूरकरांना आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांना कितीही सुरक्षा दिली तरी कोल्हापूरी हिसका दाखवू, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण’?, भाजपचा सवाल
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
