मुंबई: क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. समीर वानखेडे यांनी आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर राज्यात या प्रकरणावरुन अनेक उलाढाली झाल्या. हे प्रकरण वानखेडे यांच्या अगदी वैयक्तीक आयुष्यापर्यंत गेलं. आता मात्र आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढण्यात आला असल्याची चर्चा होती. आता यावरच समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
समीर वानखेडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटले आहे की, आर्यन खान केस प्रकरणाचा तपास माझ्याकडून काढून घेण्यात आला नाही. या संबंधी मीच न्यायालयात एक रिट पीटिशन दाखल केली होती आणि या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेकडून करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आर्यन खान आणि समीर खान यांच्या प्रकरणाचा तपास आता दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणेच्या एसआयटी कडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा तपास आता एनसीबीच्या दिल्लीतील आणि मुंबईतील टीममध्ये समन्वयाने करण्यात येणार असल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे.
I've not been removed from investigation. It was my writ petition in court that the matter be probed by a central agency. So Aryan case & Sameer Khan case are being probed by Delhi NCB's SIT. It's a coordination b/w NCB teams of Delhi & Mumbai:NCB Zonal Dir Sameer Wankhede to ANI pic.twitter.com/Hf7ZrjwVex
— ANI (@ANI) November 5, 2021
दरम्यान दिल्ली एनसीबीची एक टीम उद्या मुंबईमध्ये येणार आहे. आर्यन खान आणि नवाब मलिकांचे जावाई समीर खान यांच्यासह इतर चार केसचा तपास आता या टीमकडून करण्यात येणार आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज या प्रकरणाचा समावेश आहे. दरम्यान मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे. या सहा प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीचे अधिकारी संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली केला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- हा तर फक्त लॉलिपॉप; पेट्रोल-डिझेल दरकपातीवर काँग्रेसचं टीकास्त्र
- ‘मुख्यमंत्री माझ्या कानात एक वाक्य बोलले तेव्हाच ठरवलं आता भांडाफोड करायचाच’
- अनिल देशमुखांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज करणार; वकिलांनी दिली माहिती
- कृषी कायद्यांना विरोध करणारे गावातील बेरोजगार दारुडे; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
- किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ

