Share

लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम या सरकारकडून होतंय; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

Published On: 

मुंबई : लालबागच्या राजाच्या दरबारी पोलिसांनी केलेल्या दादागिरीवरुन नवा वाद उभा राहिला आहे. कधी कार्यकर्त्यांची तर कधी पोलिसांची अरेरावी या परिसरात पाहायला मिळते. पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी तर एखाद्या गुंडाप्रमाणे वागल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.

गेल्या दोन वर्षापासून माध्यमांवर दबाव आणण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. कधी खोटे गुन्हे दाखल करायचे, कधी कोणाला अटक करायचं, कोणावर कारवाया करायच्या. एकप्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम या सरकारकडून होतं आहे, असा गंभीर आरोप फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

लालबाग येथे पत्रकारांसोबत झालेली वर्तणूक अतिशय दुर्दैवी आहे. पत्रकारांसंदर्भात अशी भाषा वापरणे आणि अशी दंडुकेशाही योग्य नाही. आधी तत्काळ कारवाई करा, नंतर चौकशी करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे.

निकम यांनी स्वत: मास्क न घालता पत्रकारांना धक्काबुक्की करत मंडपातून हकलून देतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. मीडियाकर्मींनी पोलीस निरीक्षक संजय निकम यांना प्रेमाने, समजुतीने बोलण्यासं सांगितलं, त्यावेळी त्यांचा पारा आणखी चढला. यावेळी निकम यांनी हातच नाही तर पायही बोलतील, असं म्हणत पत्रकारांना मंडपातून हकलून दिलं आहे.

लालबागचा राजा गणपतीच्या अपडेट बातम्या करण्यासाठी पत्रकार जमले होते. या पत्रकारांकडे अधिकृत प्रवेशाचे पास असतानाही पोलिसांनी पत्रकारांना मंडपात जाण्यापासून रोखलं आणि प्रवेश देणार नाही, इथून दोन मिनिटात बाहेर पडा, असं म्हणत संजय निकम यांनी थेट पत्रकारांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!