🕒 1 min read
कोलकाता – पश्चिम बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भवानीपूर मतदारसंघातून प्रियंका टिबरीवाल बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. समशेरगंज मधून मिलन घोष आणि जंगीपूर मधून सुजीत दास निवडणूक लढवतील.
पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील याचिकाकर्त्या प्रियंका टिबरीवाल यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींना घेरण्यासाठी भाजपा मोठी रणनीती आखत आहे. बैरकपुरचे खासदार अर्जुन सिंह यांना भवानीपूर मतदार संघाचे निरीक्षक बनवण्यात आले आहेत.
अर्जुन सिंह यांच्यासोबत खासदार सौमित्र खान आणि ज्योतिर्मय सिंह यांना देखील जबाबदारी दिली आहे. तसेच सरचिटणीस संजय सिंह यांना भवानीपूरचे प्रभारी बनवण्यात आले आहे. भाजपाने प्रत्येक प्रभागाची एका-एका आमदाराला जबाबदारी दिली आहे. तर अभिनेता रुद्रनील घोष यांना प्रचार समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मतमोजणी ३ ऑक्टोबर रोजी केली जाईल. तसेच ३० सप्टेंबरलाच पश्चिम बंगालच्या समसेरगंज, जंगीपूर आणि पिपली मध्येही पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवू शकतात. तसेच निवडणूक आयोगाने कोविड -१९ ची परिस्थिती पाहता इतर ३१ जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने बाप्पाचं आगमन
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
