लातूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे सुरूवातीला कमी झालेल्या पावसामुळे व गेल्या आठवड्यात जास्तीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे अर्ज ऑनलाईन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणी येत असून ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची विनंती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे केली आहे. या अनुषंगाने पालकमंत्री देशमुख यांनी ऑनलाईन सोबत ऑफलाईन गावातच तलाठी कार्यालयात अर्ज स्विाकारण्याच्या सुचना जिल्हाधिकारी व कृषी विभागाकडे केल्या आहेत.
लातूर जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनी व प्रशासनाने नुकसानीचे ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे. तथापी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. काही भागात इंटरनेट सुविधाही उपलब्ध नाही. याकरीता शेतकऱ्यांचे ‘ऑफ लाईन अर्ज’ स्विकारावेत अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्या प्रमाणे शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे आपले अर्ज गावातील तलाठी कार्यातयात जमा करण्याचे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने बाप्पाचं आगमन
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
