Share

‘अन्नदाता शेतकरी नाही राहिला तर काय माती आणि दगड खाऊन जिवंत राहणार आहात का?’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  देशात सद्या वातावरण तापलं आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.

दरम्यान, या आंदोलनाला देशाच्या विविध भागातून पाठींबा मिळत आहे. आज या आंदोलनाचा ११ वा दिवस आहे. शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर आंदोलन करत असून देशातील विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “अन्नदाता शेतकरी नाही राहिला तर काय माती आणि दगड खाऊन जिवंत राहणार आहात का? हात जोडून आपल्या अन्नदाताची माफी मागा. आम्ही शेतरकरी होतो, आहोत आणि शेवटपर्यंत शेतकरीच राहू. तुम्ही आम्हाला देशद्रोही म्हणा किंवा दहशतवादी. लक्षात ठेवा मत मागायला याल तेव्हा आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू.” अशा आशयाची दोन ट्विट्स करुन केआरकेने आपला संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!