Share

आज होणाऱ्या ईडी चौकशीला पूर्वेश सरनाईकांची दांडी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचे धाकटे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांना 9 डिसेंबर रोजी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. यामध्ये 14 डिसेंबर म्हणजे आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आज पूर्वेश सरनाईक ईडी कार्यालयात गैरहजर राहणार आहेत. आजारी असल्यामुळे चौकशीला हजर राहू शकणार नसल्याचं पत्र पूर्वेश सरनाईक यांनी दिलं आहे.

टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. याप्रकरणी सरनाईक यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. आता, ईडीने मारलेल्या छापेमारीमुळे सरनाईकांची डोकेदुखी वाढणार असल्याच्या चर्चा सद्या होत आहेत.

दरम्यान, आपल्याला ताप आणि खोकला आहे. डॉक्टरांनी आपल्याला आराम करायचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आपण आज चौकशीसाठी येऊ शकत नाही, असं पत्र पूर्वेश सरनाईक यांनी आज ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!