Share

ठरलं तर मग! टी-२० विश्वचषकात २४ ऑक्टोबर रोजी रंगणार भारत-पाक क्रिकेटयूद्ध

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश हे शेजारी असले तरी त्याच्यांतील राजकीय वादामुळे ते एकमेकांचे प्रतिद्वंदी बनले आहे. यात क्रिकेटच्या मैदानात जेव्हा हे दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकासमोर येतात तेव्हा हा केवळ सामना उरत नाही. तर ही अस्तीत्वाची लढाई असते, धर्मयुद्ध असते.

यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुपची घोषणा झाली तेव्हा भारत आणि पाकिस्तान संघाचा एकाच गटात समावेश करण्यात आला. यामुळे भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेट सामना रंगणार हे नक्की झाले होते. आता केवळ प्रतिक्षा होती ती तारखेची. मंगळवारी आयसीसीने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळेपत्रकानुसार टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान सामना हा २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना असणार आहे.

विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघात आतापर्यंत झालेल्या एकाही सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे या सामन्यातही भारत विजयी होणार हे प्रत्येक भारतीय ठामपणे सांगु शकतो. गेल्या काही वर्षापासून दोन्ही क्रिकेट संघ एकमेकाविरोधात क्रिकेटच्या मैदानात केवळ आयसीसीच्या मालिकेत भीडत असतात. त्यामुळे दोन्ही देशाचे क्रिकेट रसीक या सामन्याची आतुरतेने वाट बघत असतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!