Share

अफगाणिस्तानच्या प्रसिध्द निर्मातीने मागितले मदतीचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये काल प्रवेश केल्यानंतर काही तासांतच अध्यक्षीय प्रासादाचा ताबा घेतला आहे. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अमुरल्लाह सालेह हे दोघेही अफगाणिस्तान सोडून ताजिकिस्तानमध्ये गेले आहेत. काबुल विमानतळावर विविध देशांचे राजनैतिक अधिकारी, कर्मचारी, आणि अन्य अफगाणी लोकांनी आश्रय घेतला असून तिथे गोळीबार होत आहे.

शेकडो अफगाणी, सरकारी मंत्री आणि कर्मचारी, महिला आणि लहान मुलं विमानतळावर दाटीवाटीन बसून आहेत आणि देशातून बाहेर जाणाऱ्या विमानांची वाट पाहात आहेत. अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांनी आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरनं विमानतळावर आणलं आहे. एकूणच अफगाणिस्तान मधील स्थिती ही भयानक असून आता जो तो जीव वाचवून इतर देशात जाण्यासाठी धडपड करत आहेत. या परिस्थितीबाबत अफगाणी चित्रपट निर्माती सारा करीमीने एका पत्राद्वारे मदतीचे आवाहन केले आहे.

https://www.instagram.com/p/CSltqbZD57I/?utm_source=ig_web_copy_link

साराने पोस्टमध्ये अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबात सांगितेले आहे. तालिबानी लोक अफगाणी महिलांवर अत्याचार आणि जबरदस्ती करत असून तालिबानी हे आर्टिस्ट, इतिहासकार, सरकारी नोकर, जवळपास सर्वांनाच मारत असल्याचे तिने यात म्हटले आहे. तालिबानी लोकांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला तर देशातील कलेचा नाश होईल.

पुढे ती म्हणाली, मी आणि इतर काही चित्रपट निर्माते त्यांच्या हिट लिस्टवर आहोत. ते महिलांचे सर्व हक्क काढून घेतील. आमच्या जिवाला धोका आहे. आमच तोंड बंद करण्यात येत आहे. टाळा लावण्यात येईल. काही आठवड्यांमध्येच तालिबानी लोकांनी येथील शाळा उद्धवस्त केल्या. जवळपास ९० लाख मुलींचे भविष्य धोक्यात असल्याचे ही तिने सांगितले असल्याने यातून तेथील भयावह परिस्थिती समजून येत आहे.

दरम्यान, बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने १६ ऑगस्ट रोजी इन्स्टाग्राम अकाऊंटवर सारा करीमीची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये साराने लोकांना एकत्र येऊन या विरोधात लढण्याचे आवाहन केले आहे. तसेच हे ट्विट शेअर करत अनुरागने साराची ही पोस्ट अनेक लोकांपर्यंत पोहचविण्यास सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!