🕒 1 min read
मुंबई : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १७ ऑक्टोबर पासुन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळवीण्यात येईल.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना हा कट्टर प्रतिद्वंदी पाकिस्तान सोबत असणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी हा सामना दुबई येथे खेळविण्यात येणार आहे. पाकिस्तानव्यतिरिक्त भारताच्या ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, न्युझीलंड या संघाचा समावेश आहे. तसेच पात्रता फेरीच्या निकालानंतर दोन संघाचा समावेश या ग्रुपमध्ये होणार आहे.
मुख्य स्पर्धेत भारताला पाच सामने खेळावे लागणार आहे. पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध, दुसरा सामना ३१ ऑक्टोबर रोजी न्युझीलंडसोबत तिसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर पात्रता फेरीतील ब गटातील पहिल्या संघासोबत ५ नोव्हेंबर रोजी तर ८ नोव्हेंबर रोजी पात्रता फेरीतील अ गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघासोबत होणार आहे. येत्या १० सप्टेंबर पर्यंत स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्याची सुचना आयसीसीने दिली आहे.
टी २० विश्वचषक-२०२१ भारताचे वेळापत्रक
२४ ऑक्टोबर पाकिस्तान (दुबई)
३१ ऑक्टोबर न्यूझीलंड(दुबई)
३ नोव्हेंबर अफगाणिस्तान(अबुधाबी)
५ नोव्हेंबर क्वालिफायर ब-१(दुबई)
८ नोव्हेंबर क्वालिफायर अ-२(दुबई)
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारतात शांतता नांदावी यासाठी लोकसभा अध्यक्ष्यांचे तिरुपतीला साकडे’
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची होणार आज घोषणा
- अफगाणिस्तानच्या प्रसिध्द निर्मातीने मागितले मदतीचे आवाहन
- लॉर्ड्सवर कोहलीचा मोठा विक्रम, वेस्ट इंडिजच्या महान कर्णधाराला टाकले मागे
- केएल राहुलने संपवला 44 वर्षांचा दुष्काळ, अशी कामगिरी करणारे गावस्कर होते पहिले भारतीय सलामीवीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
