Share

कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर जर साईड इफेक्ट झाला तर चक्क कंपनी करणार नुकसान भरपाई !

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.

अनेक नेत्यांसह काही डॉक्टरांनी देखील कोव्हॅक्सिन या लसीवर प्रश्न निर्माण केले आहेत. कोवॅक्सिन ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे. कोव्हॅक्सिन या लसीला परवानगी देण्याआधी तिची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण न करताच परवानगी कशी दिली यावरून नागरिकांच्या मनात संभ्रमता निर्माण केली गेली. भारत बायोटेक या कंपनीला  भारत सरकारकडून कोव्हॅक्सिनच्या ५५ लाख डोसची ऑर्डर मिळाली आहे.

मात्र, या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलही पूर्ण झालं आहे आणि भारतासाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे. भारत बायोटेकनं तयार केलेली कोरोना लस कोवॅक्सिनचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे, अशी माहिती भारत बायोटेकनं दिली आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच शंकेचं निरसन झालं आहे.

प्रत्यक्ष लसीकरण सुरु झाल्यानंतर आता कोव्हॅक्सिन लस निर्मिती करणारी कंपनी भारत बायोटेकने एक महत्वाची घोषणा केली आहे. कंपनीने एका पत्राद्वारे ही घोषणा करताना म्हटलं की, ‘कोणत्याही प्रतिकूल किंवा गंभीर प्रतिकूल घटनेदरम्यान सरकारच्यावतीनं अधिकृत केंद्र आणि रुग्णालयांमध्ये चिकित्सिक स्वरुपात मान्यता प्राप्त मानकांनुसार, उपचारांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. जर लसीमुळे साईड इफेक्ट झाला तर कंपनीकडून याची भरपाई देण्यात येईल.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!