कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या १० वी, १२ वी परीक्षांच्या निश्चित तारखा घोषित केल्या होत्या. यानंतर राज्य बोर्डाच्या म्हणजेच एसएससी व एचएससी बोर्डाच्या परीक्षांच्या निश्चित तारखांबद्दल विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता आहे. योग्य नियोजन करून अभ्यास त्या पद्धतीने सुरु करता याव्यात यासाठी तारखांची घोषणा होणे महत्वाचे आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पाचवी ते आठवी इयत्तेच्या शाळा सुरु करण्यासोबतच राज्य बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांबाबत देखील माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यापासून होतील असं सुचून विधान त्यांनी केलं आहे.
दरम्यान, याबाबत त्यांनी अधिकृत तारीख वा बोर्डाचा निर्णय सांगितलेला नाही. पुढे त्या म्हणाल्या, ’10 वी आणि 12 च्या परिक्षेबाबत लवकरच योग्य निर्णय सांगितला जाईल.9 ते 12 वी वर्ग सुरू करताना जी काळजी घेतली तिच काळजी पाचवी ते आठवी इयत्तेच्या शाळा सुरु करताना घेतल्या जातील. यासंदर्भात 10 दिवसात सगळी तयारी करण्यात येणार आहे.
तर, ‘शाळा सुरु केल्यानंतर आता पर्यंत कुणाला कोरोना लागण झाली नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता आहे. 2025 पर्यंत शाळांची गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय शाळेत इंटरनेट पोहचवलं जाईल. माझं शिक्षण माझं भविष्य, शिक्षण क्षेत्रातील नवीन टॅगलाईन असेल,’ अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आम्ही दोन दिवसांआड पाणीपुरवठा करू-आंबेडकरांची ग्वाही
- फडणवीस आणि माझ्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका; पाटलांचा पवारांना इशारा
- शेतक-यांना मन की बात नाही तर काम की बात पाहिजे- यशोमती ठाकूर
- पंतप्रधान मोदी हे उद्योगपतींचे गुलाम; थोरातांची विखारी टीका
- ‘बंड केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही’


