ऑस्ट्रेलिया : बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला काल (15 जानेवारी) पासून सुरुवात झाली. ब्रिस्बेन येथील ‘द गाबा’ या मैदानात हा सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने काल टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच भारतीय टीमने चांगली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 369 धावांवर संपुष्टात आणला.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३६९ धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरूवात अडखळती झाली. सलामीवीर शुबमन गिल अवघ्या ७ धावांवर झेलबाद झाला. अनुभवी खेळाडू व उपकर्णधार रोहित शर्मा मोठी खेळी करणार अशी चाहत्यांना आशा होती. पण ४४ धावांवर असताना बेजबाबदार फटका खेळत बाद झाला. आपली १००वी कसोटी खेळणाऱ्या फिरकीपटू नॅथन लायनने रोहितला माघारी धाडलं.
संयमी खेळी करण्याची गरज असताना रोहित शर्मा क्रीजमधून पुढे आला आणि त्याने हवाई फटका खेळला. लायनने सीमारेषेवर लावलेल्या फिल्डरने रोहितचा सहज झेल पकडत त्याला तंबूत धाडले. अनुभवी रोहित शर्मा बेजबाबदार फटका मारुन बाद झाल्यानंर त्याच्या टीकेची झोड उडाली आहे. सोशल मीडियापासून समालोचनापर्यंत सर्वांनीच रोहित शर्मावर टीकास्त्र सोडत नाराजी व्यक्त केली आहे.
यावर रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिली आहे. ‘नॅथन लायनच्या गोलंदाजीवर मी जो फटका खेळलो, त्याबद्दल मला अजिबात खंत नाही. मैदानावर जाऊन काही षटके खेळल्यानंतर चेंडू स्विंग होत नसल्याचे माझ्या लक्षात आले. माझे बाद होणे दुर्देवी आहे. पण त्या बद्दल मला खंत नाही. मैदानावर गेल्यानंतर गोलंदाजांवर दबाव टाकायला मला आवडते. गोलंदाजांवर दबाव टाकणे, ही माझी या संघातील भूमिका आहे’ असं रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्य बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांबाबदल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं सूचक विधान !
- फडणवीस आणि माझ्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका; पाटलांचा पवारांना इशारा
- शेतक-यांना मन की बात नाही तर काम की बात पाहिजे- यशोमती ठाकूर
- पंतप्रधान मोदी हे उद्योगपतींचे गुलाम; थोरातांची विखारी टीका
- ‘बंड केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही’


