पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. यानंतर या आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील महिलावर्ग नाराज झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते.
पुढे काही फोटो व कथित ऑडिओ रेकॉर्ड्स समोर आले होते. यातील काही क्लिप्समध्ये पूजाशी संजय राठोड यांचे संभाषण झाल्याचा आरोप भाजपने केला होता. संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्र घेत त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेऊन रितसर चौकशी करावी अशी मागणी केली होती. वाढत्या तणावानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या वनमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. मात्र आता पुन्हा हेच संजय राठोड हे मंत्रिमंडळात असायला हवे असे सेनेच्या मंत्र्यांना वाटू लागले आहे.
‘संजय राठोड यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील,’ असं सूचक विधान सेनेचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत केलं आहे. उदय सामंत शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे. सावंतांच्या या विधानानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगलेच आक्रमक झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जर राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर भाजप आंदोलन करेल. आंदोलनासाठी तयार राहा, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच महाराष्ट्रामध्ये सध्या कोणत्याही विषयाचा शेवट होत नाही. संजय राठोडांचा राजीनामा घेतल्यानंतर पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येची नेमकी काय चौकशी झाली हे समोर आल पाहिजे.’ असे देखील ते म्हणाले आहेत.
तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘निष्पाप मुलीच्या हत्येचे पाप डोक्यावर असणाऱ्याला पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागलेत’, अशी टीका त्यांनी केली आहे. ‘एका माळेचे मणी आणि ओवायला नाही कुणी अशी गत राज्य सरकारची आहे. एका निष्पाप मुलीच्या हत्येचं पाप डोक्यावर असणाऱ्याला म्हणे पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागलेत. ज्यांनी यावर प्रतिक्रिया दिली त्यांनाही एकदा तपासून घ्याच. जे सगळे चट्टेबट्टे कसे एक आहेत हे लक्षात येईल’ अशी टीका वाघ यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत अखंड उड्डाणपुलाच्या तांत्रिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश
- ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू!’, चंद्रकांत पाटील यांचा टोला
- ‘तोल सांभाळा! नाहीतर महाराष्ट्रातही काँग्रेस अशीच कोसळेल’, ‘त्या’ घटनेवरून भाजपचा सल्ला
- ‘उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइनचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या’, खा.ओमराजेंच्या सूचना
- मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला टेम्पोची धडक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

