औरंगाबाद : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे केंदीय सदस्य तथा महाराष्ट्राचे प्रभारी अलोक कुमार, नागपुर क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल आणि खासदार इम्तियाज जलील यांची चिकलठाणा विमानतळ दालनात औरंगाबाद जिल्ह्यातील एनएचएआय मार्फत प्रस्तावित व प्रगतीपथावरील प्रकल्पावर महत्वपुर्ण बैठक पार पडली. सदरील बैठकीत चर्चेदरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद ते शिर्डी रस्ता चौपदरीकरण, वसंतराव नाईक चौक ते केम्ब्रिज शाळेपर्यंत अखंड उड्डाणपुल आणि सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड येथील औट्रम बोगद्यासह पर्यायी रस्ता देण्यात यावे अशी मागणी केली. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिने आणि नागरीकांची मागणी व गरज लक्षात घेता सदरील प्रकल्प अतिमहत्वाचे असल्याने सविस्तर लेखी पत्रासह इतर संबंधित कागदपत्रे सुध्दा दिली.
खासदार इम्तियाज जलील यांनी मागणी व सुचित केलेले प्रकल्प व कामे ही औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिने अतिमहत्वाचे आणि जनहिताचे असल्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्गचे केंद्रीय सदस्य तथा महाराष्ट्राचे प्रभारी अलोक कुमार यांनी प्रकल्प संचालक अरविंद काळे यांना औरंगाबाद ते शिर्डी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी तांत्रिक सर्वेक्षण करुन वाहतुक आणि तांत्रिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. औरंगाबाद शहराचे व औद्योगिक क्षेत्राचे विकास होत असतांना वाहतुकीच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचे असलेले वसंतराव नाईक चौक ते केम्ब्रिज शाळेपर्यंत अखंड उड्डाणपुल बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त व इतर संबंधित विभागासोबत संयुक्तरित्या बैठक घ्यावी तसेच स्थळ पाहणी व तांत्रिक सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्यात यावे. तसेच सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या तिसऱ्या पॅकेजचा सर्वात महत्वाचा टप्पा असलेल्या कन्नड येथील डोंगर पोखरुन औट्रम घाटातील बोगदा तयार करतांना नैसर्गिक साधनसामुग्रीला अधिक नुकसान न देता वाहतुकीस इतर पर्यायी रस्ता सुध्दा तयार करण्यासाठी त्वरीत अहवाल तयार करुन सादर करण्याचे निर्देश दिले.
खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर अलोक कुमार यांनी त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने औरंगाबाद विभागाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी चर्चेदरम्यान व दिलेल्या पत्रात नमुद केलेल्या सर्व मुद्दयांवर त्वरीत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नागपूरचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल व इतर संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे : समाविष्ट गावांना फडणवीस सरकारने किती हजार कोटी दिले होते ? प्रशांत जगताप यांचा सवाल
- ‘दलित पँथरच्या चळवळीवर चित्रपटाची निर्मिती करण्याची गरज’
- राज्यातील साखर कारखाने केंद्रामुळे वाचले, नवे मंत्रालय सहकाराच्या भल्यासाठीच – पाटील
- राज्यात आज 10,458 रुग्णांना डिस्चार्ज, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक नेते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच -अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

