जयपूर- राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटात सचिन पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानं राजकीय संकट उभं राहिलं आहे.
पक्षाविरोधात बंडखोरी केल्यानं काँग्रेसनं सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केलं. तर दुसरीकडे विधानसभेच्या अध्यक्षांना सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीला पायलट समर्थक आमदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
तर दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषदेत कथित ध्वनिफितीचा उल्लेख करत त्यातील तिघांच्या संभाषणाची माहिती दिली. ही ध्वनिफीत पत्रकारांना ऐकवण्यात आली नाही. या कथित ध्वनिफितीत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, काँग्रेसचे आमदार भवरलाल शर्मा आणि जयपूरस्थित व्यापारी संजय जैन हे तिघे गेहलोत सरकार पाडण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना लाच देण्यासंदर्भात एकमेकांशी बोलत असल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला.
दरम्यान, आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लक्ष्यवेधी प्रतिक्रिया दिली आहे. पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्री बनवण्यात आले, मग राजस्थानमध्ये असे का घडले नाही? या प्रश्नावर मुख्यमंत्री गेहलोत यांनी ‘तो हायकमांडचा निर्णय होता’ असे उत्तर दिले. “बहुतांश आमदारांचा मला पाठिंबा होता आणि राजस्थानची स्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत वेगळी होती. राजस्थानमध्ये लोकांना मला मुख्यमंत्री झालेले पाहायचे होते” असे गेहलोत यांनी सांगितले. “जेव्हा तुम्ही अतिमहत्वकांक्षी होता, तेव्हा तुमचे विचार मागे पडतात. सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना मिठी मारेन” असे गेहलोत म्हणाले.
“राजस्थानात आमचे सरकार स्थापन झाल्यापासूनच सचिन पायलट ते सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते तसेच मागच्या दीड वर्षांपासून आमच्यात कुठलाही संवाद नाहीय” असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी सांगितले. “मंत्री त्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर बोलत नव्हता, तसेच कुठला सल्लाही घेत नव्हता. आमच्यात कुठलाही संवाद नव्हता. लोकशाहीमध्ये प्रतिस्पर्धीही परस्परांशी बोलतात. लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा आहे” असे अशोक गेहलोत एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. लोकसत्ताने या संदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारतात कोरोनाचा हाहाकार ; २४ तासांत ३४,८८४ नवे कोरोना रुग्ण
शिवसेना खासदार पुत्राची पोलिसांशी हुज्जत, निलेश राणेंनी समोर आणला व्हिडीओ
मोठी बातमी : भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असणाऱ्या वरवरा राव यांना कोरोनाची लागण
पुणे, ठाणे नंतर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाऊन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

