Share

भारतात कोरोनाचा हाहाकार ; २४ तासांत ३४,८८४ नवे कोरोना रुग्ण

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ३४ हजार ८८४ नव्या रुणांची नोंद झाली, असून ६७१ रुग्णांचा मृत्यू झाला आणि २२ हजार ९४२ रुग्ण बरे झाले.

देशात आतापर्यंत करोनामुळे २६ हजार २७३ जणांचा मृत्यू झाला आहे तर अद्याप ३ लाख ५८ हजार ६९२ जणांवर उपचार सुरू आहेत. बरे होण्याचे प्रमाण ६३.३३ टक्के झाले आहे. आतापर्यंत ६ लाख ५३ हजार ७५१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला करोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाख ३८ हजार ७१६ वर पोहचली आहे. देशात २९ फेब्रुवारीला पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णसंख्या पाच लाखांवर जाण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला. २६ जूनला पाच लाख असलेली बाधितांची संख्या शुक्रवारी १० लाखांच्या पुढे गेली. म्हणजेच देशात अवघ्या २० दिवसांत दुप्पट रुग्णवाढ झाली.

एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी १.९४ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. ०.३५ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले असून २.८१ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

राज्यात कोरोनाच्या साडे तेरा लाख चाचण्या, राजेश टोपेंची माहिती

राज्यातील आणखी एका जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन

अभिमानास्पद ! केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची WHOच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!