🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याने कणकवलीमध्ये पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याचा आरोप करत एक व्हिडिओ माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट केला आहे. निलेश राणे यांनी गीतेश राऊतांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
निलेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 22 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. कणकवलीमध्ये एका चौकात गीतेश राऊत यांची पोलिसांनी गाडी अडवली आहे. यावेळी गीतेश राऊत आणि एका पोलिसात गाडी वळवण्यावरून वाद झाला आहे. यावेळी, गीतेश राऊत यांनी दुसऱ्या पोलिसाला, ‘मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे, याने मला शिवी दिली, याला मी सोडणार नाही’ असं म्हणत असल्याचं दिसून आलं आहे. तर पोलिसाने पहिली गीतेश राऊत यांनी शिवी दिल्याचं म्हणत आहे. तसंच, या पोलिसाने तू माझी नोकरी घालवणार कोण? असा सवाल केला आहे. या 22 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कणकवलीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
‘शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलिसवाला ड्यूटी करतोय आणि खासदाराचा मुलगा दारू पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतोय. दारू पिऊन गाडी वेडी वाकडी चालवली तर पोलिस पकडणारचं. ही Section 353 आणि 185 अंतर्गत केस बनते’. अस ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलिसवाला ड्यूटी करतोय आणि खासदाराचा मुलगा दारू पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतोय. दारू पिऊन गाडी वेडी वाकडी चालवली तर पोलिस पकडणारचं. ही Section 353 आणि 185 अंतर्गत केस बनते. pic.twitter.com/ELqkjFFB30
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 17, 2020
हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणावर खुलासा केला आहे. ‘दारू पिऊन पोलिसांनी हुज्जत घालण्याचा कुणी आरोप करत असेल तर माझा मुलगा साधी सुपारी सुद्धा घेत नाही. त्यामुळे तरीही मी पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.’
दुर्घटनाग्रस्त ईमारतीतील बेघर रहिवाश्यांचे तातडीने पुनर्वसन करा- दरेकर
ही गाडी माझ्याचं मुलाची असून गाडीत गीतेशच आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. जर माझा मुलगा जर दोषी असेल तर कारवाई करावी किंवा जर पोलीस दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.
‘महाराष्ट्रात वैचारिक, सामाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्याचं मोठं श्रेय लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
