🕒 1 min read
कोल्हापूर : कोल्हापुरात सोमवारपासून (20 जुलै) सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातील ठाणे, पुणे-पिंपरी, पनवेल, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
कोल्हापुरात येत्या सोमवारपासून म्हणजेच 20 जुलैपासून सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. यादरम्यान, सर्व नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध आणि दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत.
सतेज पाटील यांचे कोल्हापूरकरांना आवाहन
कोल्हापूरकरांनो सतर्क राहा, खबरदारी घ्या! सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवस लॉकडाउन… कोरोना च्या वाढत्या प्रसारामुळे आज ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब , सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात येत्या सोमवार पासून सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
कोरोना उपचारासाठी मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही तातडीने अधिकची व्यवस्था उभी करा
कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम योग्य पद्धतीने व काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वजण प्रयत्न करूया, कोरोना संकटाचा मुकाबला करूया !
-सतेज पाटील
गणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणातील गावोगावच्या दक्षता समित्यांनी सतर्क राहावे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
