मुंबई : यंदा संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून जात आहे. अशातच राज्यात परतीचा पाऊस, कीड, अतिवृष्टी, आदी संकटांची भर पडत आहे. तर, मुंबईच्या चिंतेत अजून एक भर पडली असून अवघी मुंबई वीजसंकटात सापडली आहे. मुंबईसह उपनगरामध्ये आज सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे.
उपनगरांमध्ये काही भागात वीज आली असली तरी अजून तासाभराची मुंबईकरांना करावी लागेल असं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. “महापारेषणच्या कळवा- पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई मधील वीज खंडीत झाली.याचा (cascading effect) मुळे मुंबई व मुंबई उपनगरातील वीज देखील खंडीत झाली आहे.
महापारेषण कॅपनीचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. एका तासात वीज पूर्ववत सुरू होईल . वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्याची चौकशी करण्यात येईल.” अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.
मागील काही काळापासून महाराष्ट्र सरकारविरोधात भूमिका घेणारी अभिनेत्री कंगनाने ट्विटरवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि स्टॅण्डअप कॉमेडियन कुणार कामराचा फोटो शेअर करत महाराष्ट्र सरकारला टोला लगावला आहे. राऊत यांनी कुणालच्या पॉडकास्टला काल हजेरी लावली त्याचा फोटो कुणालने शेअर केला होता. हाच फोटो ट्विट करत कंगनाने, “मुंबईत वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार क-क-क…….कंगना करण्यात व्यस्त आहे,” असं ट्विट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- चीनच्या मदतीने पुन्हा कश्मीरात 370 लागू करू, फारुख अब्दुला यांचे विषारी फुत्कार
- ‘राहुल आणि प्रियंका गांधी यांना शेळ्यामेंढ्यामधला फरक सुद्धा कळणार नाही’
- ‘तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी शासनासह वैयक्तिक स्तरावर प्रयत्नशील’
- ‘सोशल मिडियावर एखाद्याला शिवीगाळ करणं… ट्रोल करणं… खाजगी आयुष्यात डोकावणं चुकीचं’
- शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तातडीने सादर करा !


