बीड:- माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा काल 80 वा वाढदिवस झाला. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, देशाचं संरक्षणमंत्री पद, कृषीमंत्रीपद अशी अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहे. सध्या शरद पवार हे राज्यसभा खासदार आहेत. महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामध्ये त्यांनी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली होती. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार म्हणजेच शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी यांची मूठ बांधण्यात आली. काल शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. काल 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
त्या काळात जर पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्यावर विश्वास टाकला नसता, तर आज इथे तुम्हाला तुमचा धनंजय मुंडे दिसला नसता, साहेबांचा वाढदिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत. परळीमध्ये शरद पवार यांचा 81 किलोचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी धनंजय मुंडेंनी उपस्थितांना संबोधित केलं.
साहेबांचे उपकार फेडायचे म्हणून हा सोहळा आयोजित केला आहे. मी शरद पवार यांच्यात प्रत्यक्ष देव पाहिलाय. अडचण सोडविणारे देव माणूस पवार साहेब आहेत. परळीच्या जनतेनी 30 हजार मतांनी निवडून दिले असून, जनतेने माझ्यावर उपकार केले आहेत. 25 वर्षांपासून मी तुमच्या सेवेत आहेत, पुढेही राहीन, असंही मुंडे म्हणाले आहेत.
दरम्यान, हा कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर चांगलाच गोंधळ उडाला. केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची स्टेजवर झुंबड उडाली होती, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापराचे नियम 1 जानेवारीपासून बदलणार…
- बळीराजावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, पुढील दोन दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
- शेतकरी आंदोलन : वॉशिंग्टनमध्ये म. गांधींच्या पुतळ्याची विटंबना,खलिस्तानी झेंड्यानं झाकला चेहरा
- पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या मुलीच्या ‘त्या’ अफवांवरून नाराज
- शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे; राजू शेट्टींचा सरकारला इशारा


