🕒 1 min read
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले आहे.
मात्र, शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल सकाळी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं गेल. यावेळी पडळकरांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत विखारी टीका केली होती.
धनगर नेते गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद यांना असलेला विरोध तीव्र होत असताना राज्यातील दुसरे धनगर नेते महादेव जाणकर हे शरद पवारांच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र आहे. जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. या कार्यक्रमात माजी मंत्री जाणकर यांनी शरद पवारांसमोर एकत्र येण्याचा प्रस्तावच मांडला असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या (ST) सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहनही जाणकर यांनी केले.
मराठा आणि होळकर समाजाची शिवाजी महाराजांनी सोयरिकीची मोट बांधली होती. याचा आधार घेत जानकरांनी पवारांना दिल्लीची गादी हस्तगत कशी करता येईल, याबाबत सांगितले. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करू शकतो, असे जानकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अहिल्यादेवींचा इतका आदर वाटतो तर पवारांनी धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही?’
- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा, ग्राहकांचे तब्बल दीड कोटी लाटले…
- १५०० स्वेअर फूटापर्यंतच्या बांधकामाला परवानगीची गरज नाही- शिंदे
- औरंगाबादचे नामकरण लवकरच संभाजीनगर, एकनाथ शिंदेंची माहिती
- कापुसवाडगावात ‘महिला राज’, सरपंचपदी आशाबाई धामणे, मंदा थोरात उपसरपंचपदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
