Share

आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना मिळणार पाच लाख, ‘एके 47’ जमा केल्यास 25,000 रूपये

Published On: 

तिरुअनंतपुरम : जे माओवादी आत्मसमर्पण करू इच्छितात आणि पुन्हा मुख्य प्रवाहात येऊ इच्छितात त्या सर्वांसाठी केरळ सरकारने एक अफलातून पॅकेजची घोषणा केली आहे. हे पॅकेज दे्ण्याचे मुख्य कारण हे माओवाद्यांच्या जाळयात अडकलेल्यांना बाहेर काढणे व त्यांच्या संघटनेत जाणाऱ्यांना रोखण्यासाठी आहे, असे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सांगितले.या पॅकेजविषयीचा हा निर्णय मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या साप्ताहिक मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

काय आहे हे हे पॅकेज?

  • जे माओवादी आत्मसमर्पण करू इच्छितात आणि पुन्हा मुख्य प्रवाहात येऊ इच्छितात त्या सर्वांसाठी एक घर आणि 5 लाख रुपये देण्यात येतील .
  • पुनर्वसन पॅकेज देण्यापूर्वी सर्व पडताळणी होईल, तसेच खात्रीने निरीक्षण केले जाईल.
  • शरण आलेल्या माओवाद्यांच्या स्थितीनुसार हे पॅकेज ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. क्रमवारी श्रेणी ‘अ’ उच्च स्थानी असून त्यात प्रत्येकी 5 लाख रुपये, तर अन्य दोन श्रेणीत प्रत्येकी 3 लाख रुपये हफ्त्यांमध्ये दिले जाणार आहे.
  • शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना 15,000 रुपये, लग्नासाठी 25 हजार रुपये दिले जाणार आहे. ज्यांना हे पॅकेज हवे आहे, अशांना तीन महिन्याचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल.
  • ‘एके 47’ जमा केल्यास त्याच्या बदल्यात 25,000 रूपये तर, अन्य शस्त्रास्त्रे जमा केल्यास त्यापेक्षा कमी रक्कम दिली जाईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!