Share

एका माळेचे मणी : नेतेच कोरोनाचे नियम पाळत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी तरी ते का पाळावेत?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात एका बाजूला शिवजयंतीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घातले असताना दुसऱ्या बाजूला मात्र राजकीय पक्षांचे कार्यक्रम जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे.सत्ताधारी असोत किंवा विरोधक दोन्ही बाजूंचे सभा,मेळावे धुमधडाक्यात सुरु असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात येत्या शनिवारी वशाटोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वशाटोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेला काळजी घ्या असे सांगत शिवजयंतीवर निर्बंध घालत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे नेते जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहे.

सत्ताधारी पक्षाच्या वशाटोत्सवाची चर्चा असताना विरोधक तरी कुठे धड आहेत असं विचारण्याची वेळ आली आहे कारण याच पुण्यात आज भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘युवा वॉरियर्स’ अभियानाचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

कोंढवे-धावडे येथील दामिनी लॉन्समध्ये झालेल्या सोहळ्याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, ‘भाजयुमो’चे प्रदेश उपाध्यक्ष व युवा वॉरिअर्स राज्य संयोजक अनुप मोरे, सरचिटणीस सुशील मेंगडे, भाजयुमो पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर, पुणे जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संकेत चोंधे, पुणे शहर प्रभारी राजेंद्र साबळे, राहुल महाडिक, गणेश भेगडे, कार्यकारिणी सदस्य गणेश वर्पे, सचिन जायभाये, अजित कुलथे, सुशांत गाडे, निवेदिता एकबोटे आदी उपस्थित होते.

‘युवा वॉरियर्स’च्या लोगोचे, टी-शर्ट व टोपीचे अनावरण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला देखील मोठी गर्दी होती. चंद्रकांत पाटील यांनी जरी या कार्यक्रमात काही वेळ मास्क घातलेला दिसत असला तरीही इतरांनी मात्र कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसू आले.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.  राज्यभर सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रम मोठ्या स्वरूपात होत असताना शिवजयंतीला परवानगी नाकारणे हे दुर्दैव आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे काळजी घेऊन शिवजयंती साजरी करण्याची परवानगी द्यायला हवी होती. एका पक्षाचे अध्यक्ष गावोगाव जाऊन कार्यक्रम, मेळावे घेतात. त्यावर निर्बंध नाहीत. मात्र, शिवजयंतीला निर्बंध घातले जातात. अभिव्यक्त होणाऱ्या लोकांवर बंदी घालण्याची भाषा निंदनीय आहे. एल्गार परिषद होते. मात्र, पोवाडे चालत नाहीत. हिंदू धर्म हा सहनशील आणि सहिष्णू असल्याने सर्वधर्मसमभावाचे धडे देण्याचे केविलवाणे प्रयत्न अनेकजण करतात. त्यामुळे जाज्वल्य हिंदुत्व या युवाशक्तीमध्ये बिंबवण्याचा काम होण्याची आवश्यकता आहे,असेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान,ज्या कार्यक्रमात पाटील यांनी ही टीका केली त्या कार्यक्रमालाच परवानगी कशी मिळाली हा एका वेगळ्या बातमीचा विषय होऊ शकेल.या कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे आयोजकांवर का कारवाई केली जाऊ नये हा देखील सवाल उपस्थित होऊ शकतो. पुढाऱ्याच्या अश्या बेजबाबदार वागण्यामुळे कोरोना पुन्हा वाढला तर कुणाला जबाबदार धरावे हा महत्वाचा विषय ठरणार आहे.जर राजकीय पक्ष नियम पाळत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी तरी नियम का पाळावेत असा सवालही  उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!