🕒 1 min read
सोलापूर:- राज्यात सध्या वेगवेगळ्या भागात बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याचे वृत्त दिवसेंदिवस वाढत आहे. करमाळा तालुक्यात दहशत माजवणारा बिबट्याला मारण्यात यश आलं आहे. हा बिबट्या वांगी, सांगवी, ढोकरी, चिखलठाण, शेटफळ, उंदरगाव या भागातील ऊस व केळीच्या शेतात वावरत असल्याचं गेल्या काही दिवसात आढळलं होतं.
मात्र, गेल्या १५ दिवसांपासून वनविभागाला या बिबट्याचा नेमका शोध घेणं अवघड जात होतं. या बिबट्याने सोलापूर भागातील ३ जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे वनविभागाने या बिबट्यास लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत होते. यानंतर, बारामतीहून खास शार्प शुटर देखील बोलावण्यात आला होता. त्यांना देखील काही दिवस यश आलं नाही.
अखेर काल अकलूज येथील डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांना त्या बिबट्याला संपवण्यात यश आलं आहे. केवळ पंधरा फुटांवरुन फायर केल्याने अंधारातही योग्य जागी निशाणा लागल्याचे धवलसिंह मोहिते पाटील सांगतात. यावेळी मी कचरलो असतो तर याच बिबट्याची शिकार झालो असतो. हा बिबट्या अतिशय मजबूत आणि आक्रमक असल्याने त्याच्यावर नियंत्रण मिळवणे खूपच अवघड होतं. बिबट्यावर वेळीच गोळी झाडली नसती तर आज तुमच्यासमोर नसतो, असंही डॉ.धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- प.बंगालमध्ये राजकीय भूकंप; ममतांचे विश्वासू शुभेंदू अधिकरी आणि 11 आमदारांचा भाजपात प्रवेश
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश पाठोपाठ ‘या’ राज्यातील शाळा देखील होणार सुरु
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश पाठोपाठ ‘या’ राज्यातील शाळा देखील होणार सुरु
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!

