Share

पालकमंत्र्यांनी प्रशासनाची बैठक घेवून देखील मृत्यूदर थांबत नाहीत : संजय केनेकर

Published On: 

औरंगाबाद : पालकमंत्री हे शहरात येऊन प्रशासनाची बैठक घेतली. परंतु बैठकीनंतर सुध्दा कोरोना रुग्णांची संख्या तसेच  कोरोना मुळे होणारा मृत्युदर थांबत नाही. उलट मृत्युदर हा दुपटीने वाढत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकरांनी केला आहे. तसेच  कोणत्याही प्रकारचे नियोजन कोरोना संदर्भात हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेले नसल्याचे या वेळी केनेकर म्हणाले.

औरंगाबाद शहरामध्ये कोरोना संसर्ग असणाऱ्या रुग्णांची तसेच मृत्युचा दर देखील खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालला असल्याची परिस्थिती फेब्रुवारी महिन्यापासुन सुरु आहे. तर स्थिती जैसे थे तशीच आहे. रुग्णांची पिळवणूक थांबलेली नाही. पालकमंत्री यांनी लवकरात लवकर शहरावर विशेष लक्ष देऊन नियोजन करण्याची गरज आहे. कोरानाचे वाढते प्रमाण तसेच मृत्युचे वाढते दर देखील थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्यात सरकार पुर्णपणे फेल ठरले असल्याचा आरोप देखील या वेळी संजय केणेकर यांनी रविवारी बोलताना केला आहे.

राज्य सरकारने जर लवकरात लवकर ठोस पाऊले उचलले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतल्याशिवाय राहणार नाही. कोराना रुग्णांवर योग्य तो आणि तत्काळ उपचार करणे गरजेचे आहे. रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत खुप मोठी वाढ होत आहे. तसेच कोराना रुग्णांच्या मृत्यूचा दर देखील खुप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आपणास पहावयास मिळत आहे. तर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन, महानगर पालिकेने कठोर तसेच ठोस पाऊले उचलावीत, जेणे करुन कोराना रुग्णांना मृत्युच्या दाढेतून बाहेर काढणे सध्या तरी खुप महत्वाचे झाले असल्याचे या वेळी संजय केणेकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!