टीम महाराष्ट्र देशा : मला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर मी उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढेन अस बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधानपदाच्या दावेदारीबाबत मोठे विधान केले आहे. बसपातर्फे आंबेडकर नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
सध्या देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत मायावतींचा पक्ष मोठ्या तयारीनिशी उतरला आहे, परंतु मायावती स्वतः निवडणूक लढत नाहीत. परंतु जर पंतप्रधानपद मिळवण्याची संधी मिळाली तर मायावती यांनी निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे, तसेच त्यांनी मतदारसंघदेखील निवडला आहे.


