मुंबई : मॉडेल मिलिंद सोमण सोशल मिडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावरून मिलिंद फिटनेस संदर्भातील अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती देत असतो. त्याचे काही व्हिडिओ चाहत्यांना फायद्याचेही ठरतात, तो नेहमी लोकांना प्रोत्साहन देत असतो. मात्र यावेळी मिलिंदची पत्नी अंकिता कोनवार ही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून याची चर्चा होत आहे. यामध्ये तिने मिराबाई चानूने जिंकलेल्या ऑलिम्पिक मेडलवरून उल्लेख केला आहे.
https://www.instagram.com/p/CR0VqJelbbe/?utm_source=ig_embed&ig_rid=303f3cf2-9ef3-45eb-b57a-177c83a9a415
अंकिताने शेअर केलल्या या पोस्टमध्ये ईशान्य भारतातील लोकांना भारतात कशी वागणूक दिली जाते हे यावर आपले मत मांडले आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत अंकिताने लिहिले की, ‘जर तुम्ही ईशान्य भारतातले असाल, जर तुम्ही भारतासाठी पदक जिंकल तर तुम्ही भारतीय म्हणून ओळखले जातात. नाही तर आपण सगळे ‘चिंकी’, ‘चीनी’, ‘नेपाळी’ किंवा मग ‘कोरोनाचा कोणता तरी नवीन प्रकार’ म्हणून ओळखले जातो. भारत फक्त जातीवादच नाही तर वर्णभेदाने ग्रासलेला आहे. माझ्या अनुभवांवरून बोलते #Hypocrites.’ अंकिता ही ईशान्य भारतातील आसाममधील आहे. त्यामुळे तिला आलेल्या अनुभवाविषयी तिने सांगितले आहे. अंकिताची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने स्पर्धेतील पहिले पदक पटकावले. मणिपुर येथील मीराबाई चानुने वेटलिफ्टींग मध्ये पहिले रौप्य पदक पटकावत भारताचे खाते उघडले. मीराबाईने स्नॅच गटातील पहिल्या प्रयत्नात ८४ वजन यशस्वीपणे उचलले. दुसऱ्या प्रयत्नात तिने ८७ किलो वजल लवकर उचलले. यानंतर मात्र तिसऱ्या प्रयत्नात ८९ किलो वजन उचलण्यात मीराबाई अपयशी ठरली. यानंतर क्लीन अँड जर्क गटात मिराबाईने जोरदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. मीरीबाई चानु ४९ किलो वजन गटात सामिल झाली होती. यानंतर मीराबाई चानुचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे : 28 जुलै रोजी फेरफार अदालतीचे आयोजन, जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘पूरग्रस्त कुटुंबाला १५ हजार, घरांच्या नुकसानीसाठी ५० हजार तर व्यापारी-विक्रेत्यांना नुकसानीच्या २५ टक्के रक्कम द्या’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द


