Share

मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाची भाषा समजत नसेल तर ठोक मोर्चा काढू-जावळे पाटील

Published On: 

औरंगाबाद : मराठा आरक्षण हा विषय केंद्र तसेच राज्य सरकारसाठी चेष्टेचा विषय झाला आहे. मात्र यामुळे निर्माण झालेली गरिबी आणि बेरोजगारीतून मराठा तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र आणि राज्य सरकार आहे. तसेच याही परिस्थितीत मराठा आरक्षणावरून सुरू असलेले राजकारण लज्जास्पद आहे. राज्यकर्त्यांना मूक मोर्चाची भाषा समजत नसेल तर भविष्यात ठोक मोर्चे काढले जातील, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी गुरूवारी ( दि.८) दिला.

औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत गुरूवारी नानासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षणासह मुस्लीम आरक्षणप्रश्‍नी संघटनेची भूमिका मांडली. ते म्हणाले की, केवळ मराठा, मुस्लीम आणि इतर समाजात वाद घडवून आणण्याचे काम नेतेमंडळी करत आहेत. आरक्षणावरून मराठा समाजाचा राजकीय हेतूने वापर करण्यात आल्याचाही आरोप जावळे यांनी केला. सारथी संस्थेचे केंद्र औरंगाबाद येथे सुरू करावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करून एक हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात यावा.

कोपर्डीच्या घटनेतील दोषी नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, २०१४ ते २०२० या काळात ईएसबीसीमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्या. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृह उभारावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी जावळे यांनी मांडल्या. पत्रपरिषदेप्रसंगी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भिमराव मराठे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!