Share

Aditya Thackeray | एकनाथ शिंदे सोडले तर उरलेल्या 40 गद्दारांना मिळाला बाबाजीका ठुल्लू – आदित्य ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : ठाकरे सरकार पडल्यापासून शिवसेना पक्षामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे. पुन्हा पक्ष उभारणीसाठी शिवसैनिक मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळतं आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज जळगाव येथे जाऊन शिवसंवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निशाणा साधाला.

तुम्ही दहिहंडीचे थर लावले. तुम्ही वर चढलात, हंडी फोडली. आमचं सरकार पाडलं. जे लोकांच सरकार होतं, जनतेचं सरकार होतं, तसेच जे शेतकऱ्यांचं सरकार होतं. ते तुम्ही पाडलं. मलई तुम्ही एकट्यानं खाल्ली. उरलेल्या 40 गद्दारांना काय मिळालं?. कपिल शर्माच्या शो मधला बाबाजीका ठुल्लू?, असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

या गद्दारांचे विधानसभेमध्ये चेहरे बघण्यासारखे असतात. सगळ्या चेहऱ्यावर एकच दिसून येतं ‘गेम झाला रे बाबा’. त्यातील काहींना आहे तिच खाती मिळाली आहेत. मग तुम्हाला तिकडे जाऊन असंच करायचं होतं, तर आमचं नेमकं चुकलं तरी काय?, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना केला आहे.

तसेच, गेल्या दिवाळीत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर हे गद्दार आमदार, खासदार पोटभर जेवून गेले, त्यांनी फोटो काढले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक साधी रेघ देखील उमटली नाही. पुढे याच आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली असल्याचंही आदित्या ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यांनी केलेली ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही तर माणुसकीसोबत आहे. हे सर्व आमदार निर्लज्ज असून आजवर मुखवटे घालून फिरत होते, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!