बुलडाणा – पोलिसांच्या बदल्यामधील घोटाळा बाहेर काढल्याच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. या पाश्वर्भूमीवर ‘देवेंद्रजींना हात लावला तर नोटीस प्रमाणे महाविकास आघाडीला आग लावू’ असा इशारा आक्रमक आ. आकाश फुंडकर यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस नोटीस प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक होऊन खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर नोटिसची होळी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला. तसेच महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी बोलताना म्हटले की, देवेंद्रजी फडणवीस यांना हात लावला तर जशी नोटीस जाळण्यात आली तसेच “महाविकास आघाडी सरकारला सुद्धा आग लावु” असा आक्रमक इशारा दिला.
महत्वाच्या बातम्या –

