मुंबई : मागील काही महिन्यांमध्ये भाजपला विविध राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्यात अपयश आले आहे. अशातच, कर्नाटक, गुजरातमध्ये देखील अचानक मोठी खांदेपालट करण्यात आली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घेण्याचे ठरवले असून मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील, असा टोला शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून लगावला आहे.
संजय राऊत यांना आता भाजपकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खोचक टीका करत पलटवार केला आहे. मोदींचा चेहरा नसता तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना दोन आकड्यापर्यंतही पोहोचू शकली नसती, असा दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे.
‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून बदललं तर आम्ही त्याचं कौतुक करू. एक घर कोंबडा निष्क्रिय मुख्यमंत्री बदलला म्हणून आम्ही अख्या महाराष्ट्रात पेढे वाटू. संजय राऊत यांनी आम्हालाही कौतुक करण्याची संधी द्यावी,’ असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. यासोबतच, ‘मोदींचा चेहरा नसता तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना दोन आकड्यापर्यंतही पोहोचू शकली नसती. उद्या निवडणुकीला जाताना तुमच्याकडे मोदींचा चेहरा नसेल. तेव्हा काय होईल याची चिंता करा. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा चेहरा चालणार नाही. आदित्य बद्दल न बोललेलंच बरं,’ अशी टिपण्णी देखील राणेंनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- खंडणीखोर देखील यांची कृती पाहून आत्महत्या करतील – सुधीर मुनगंटीवार
- ‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- ‘माझ्याकडे राजकीय पर्याय उपलब्ध आहेत; सहकाऱ्यांशी चर्चा करून काय ते ठरवू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
