मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने कारवाई करत अटक केली आहे. त्यावरुन शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊतांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर शरसंधान साधलं आहे.केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्याला गाडीने चिरडल्याची घटना घडली. तेव्हापासून देशातील राजकारण तसेच शेतकरी वर्ग संतापला आहे. या पार्श्वभूमीवर राऊतांनी सामनातून भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे. राऊतांच्या टीकेवर भाष्य करताना भाजप नेते निलेश राणेंनी ट्वीट करत संजय राऊतांना उत्तर दिलं आहे.
देशात आंदोलक भडकले आणि हिंसाचार झाला. इतके मोठे मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुख खानच्या मुलाने 13 ग्रॅम ड्रग्ज घेतल्याच्या बातम्यांचा पाठलाग करीत आहे, असं राऊत ‘सामना’मध्ये म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी अंमली पदार्थांच्या विषयावर बोलण्या अगोदर प्रमुखाच्या कुटुंबात कोणी अंमली पदार्थांच्या आहारी तर गेला नाही ना याची खात्री करून घ्यावी, असा टोला लगावत अप्रत्यक्षपणे ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे. ‘नशिबाने प्रमुखाचा पोर त्या बोटीवर न्हवता नाही तर बॉलिवूडची पार्टी असली की हा फुकट्या तिथे असणारच’, असं म्हणत निलेश राणेंनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवरही टीका केली आहे.
संज्याने अमली पदार्थांच्या विषयावर बोलण्या अगोदर प्रमुखाच्या कुटुंबात कोणी अमली पदार्थांच्या आहारी तर गेला नाही ना याची खात्री करून घ्यावी. नशिबाने प्रमुखाचा पोर त्या बोटीवर न्हवता नाही तर बॉलिवूडची पार्टी असली की हा फुकट्या तिथे असणारच.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 5, 2021
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने केलेला हा अपराध दुसऱ्या एखाद्या राज्यात घडला असता तर भाजपने देश डोक्यावर घेतला असता. आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार, अराजकवादी ठरविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचे रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसने आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कितीही नौटंकी केली तरी..’ निलेश राणेंचा प्रियांका गांधींना खोचक टोला
- ‘देशासाठी मोठा त्याग करणाऱ्या कुटुंबातील प्रियंकांचा गुन्हा काय?’
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

