Share

“अंधारयात्रेवर चर्चा करण्याचे सोडून राहुल गांधी नाईट क्लबात गेले यावर…”, संजय राऊत यांची टीका

Published On: 

मुंबई : काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा नाइट क्लबमध्ये पार्टी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विरोधी पक्षांकडून काँग्रेसवर टीकास्त्रांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच अंधारयात्रेवर चर्चा करण्याचे सोडून राहुल गांधी नाईट क्लबात गेले यावर भोंगे वाजवले जात आहेत, असेही राऊत म्हणाले.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘देशाला आता कळस उरलेला नाही, पण पायाही खचतो आहे, अंधाऱ्या गर्तेत ढकलले जात आहोत. त्या अंधारयात्रेवर चर्चा करण्याचे सोडून राहुल गांधी नाईट क्लबात गेले, त्यावर भोंगे वाजवले जात आहेत. देशातील राजकारणाचा आणि चर्चेचा स्तर कमालीचा घसरला आहे. राजकारणातील माणसांची उंची आज राहिली नाही. त्यामुळे विचारांना, वैयक्तिक स्वातंत्र्यास महत्त्व राहिलेले नाही. नेपाळमध्ये खासगी भेटीवर गेलेले राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये पोहोचले व पार्टीत सहभागी झाले यावर भाजपने चर्चा सुरू केली. देशात इतके भयंकर प्रश्न निर्माण झाले असताना राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये कसे काय जाऊ शकतात? असा प्रश्न उपस्थित केल्याने काँगेस पक्षाची अडचण झाली आहे.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘भाजपने काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला आहे. जे लोक देशात हिजाबपासून भोंग्यापर्यंत कसलेही राजकारण करू शकतात, त्यांच्याकडून दुसरी कोणतीच अपेक्षा करता येणार नाही. गांधी हे नेपाळमध्ये पत्रकार मित्राच्या लग्नासाठी गेले आहेत. इतर कोणी राजकीय नेते अशा खासगी दौऱ्यावर जात नाहीत का? व गेल्यावर पंचतारांकित हॉटेल्समधल्या पार्टीला हजर राहत नाहीत का? भाजपचा सवाल असा आहे की, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असून जोधपूरमध्ये हिंसा होत आहे. त्याबद्दल राहुल गांधी यांना चिंता वाटत नाही का? उलट ते नाईट क्लबमध्ये पार्टी करत आहेत. जोधपूरमध्ये दंगलसदृश परिस्थिती आहे. जोधपूर हा देशाचाच भाग आहे. दंगली घडाव्यात असे वातावरण कोण निर्माण करीत आहे? जोधपुरात दंगल सुरू असताना देशाचे पंतप्रधानही परदेश दौर्यावरच आहेत व ते रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेली दंगल मिटविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पण देशातील दंगलसदृश स्थितीवर ते काहीच बोलत नाहीत’, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!