बीड: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र काही नागरिकांना याचे गांभीर्य अजूनही आलेले दिसत नाहीये. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यता आली आहे तसेच सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, मात्र तरीही काही दुकानदार आपली दुकाने उघडत असल्याचे दिसत आहे. केज येथे कोरोनाचे नियम पायदळी तुडवत दुकाने चालू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाच्या उद्रेकामुळे लागू असलेल्या कडक लॉकडाऊनमधून मंगळवारी सकाळच्या वेळेत सूट देण्यात आल्याने केज शहरात किराणा दुकानासह इतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली होती. तर किराणा दुकानावर गर्दी झाल्याने तीन किराणा दुकानासह इतर पाच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी सकाळी ७ ते १० पर्यंत किराणा दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मंगळवारी सकाळच्या सत्रात सूट देण्यात आल्याने तहसीलदार दुलाजी मेंडके व इतर सहकाऱ्यांनी शहरात फिरून रस्त्यावरील आणि किराणा दुकानावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. तर सूचना देऊनही किराणा दुकानावर गर्दी दिसून आल्याने तीन किराणा दुकानदारांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड केला. यासह पाच दुकानदारांना नियमांचे उल्लंघन करून दुकान उघडल्यावरून दंडात्मक केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘घरी कडी लावून बसलेल्यांना रिकामटेकडा म्हणतात’, भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला
- कमानीच्या वादातून सत्तेतील दोन पक्ष पुन्हा आमने-सामने येणार! तीन वर्षांपासून काम अपूर्णच
- ‘मुख्यमंत्री महोदय मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा कार्यक्रम करु नका’
- ‘पाटोद्यात गृह विलगीकरण बंद करा’, आ. धसांनी केल्या सूचना
- पश्चिम बंगाल हिंसाचार; भाजपच्या ७७ आमदारांना केंद्राकडून सुरक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

