🕒 1 min read
मुंबई : भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगीत करावी लागली. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर विदेशी खेळाडू हे मायदेशी परत गेले आहेत. तर भारतीय खेळाडू स्वगृही परतले असुन विविध प्रकारे कोरोनाच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवत आहे.
स्पर्धा स्थगित झाल्यानंतर केकेआरचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने कोरोना लस घेतली. लस घेतानाचा फोटो त्याने पोस्ट केला. या फोटोवर मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ख्रिस लिनने ‘मीत्रा तु किमान पँटतरी घालुन यायचं असतं’ अशी कमेंट करत त्याची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. यावर कार्तिकने त्याला जशास तसे उत्तर दिले. कार्तिक त्याला म्हणाला की,’मी तर शॉर्टस् घालणार होते मग मला आठवल की तुझ्याप्रमाणे मालदीवमध्ये नाहीये, त्यामुळे मी हे घालुन आलो.’ असे म्हणत लिनची उलट फिरकी घेतली.
Could have at least worn pants
— Chris Lynn (@lynny50) May 11, 2021
दिनेश कार्तिक आणि ख्रिस लिन हे दोघेही बरेचसे सामने केकेआरकडून एकत्र खेळलेले आहे. यामुळे त्यांची चांगलीच गट्टी जमलेली आहे. २०१९च्या लीलावात मुंबई इंडियन्सने लिनला आपल्या ताफ्यात सामिल करुन घेतले आहे. मात्र २०१९ पासुन केवळ एकाच सामन्यात लिनला संघात स्थान मिळाले. इतर वेळी तो केवळ बाकावर बसलेला होता.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी २ दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा : हरिभाऊ बागडे
- न्युझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज वॅटलिगने जाहिर केली निवृत्ती; डब्लुटीसी फायनल ठरणार आखेरचा सामना
- बार-हॉटेल मालकांप्रमाणे शेतकरी, कष्टकऱ्यांचीही दखल घ्या; रक्षा खडसेंचे पवारांना पत्र
- सिल्लोड रोडवरील सहारा व्हील अलाईमेट परिसरात दुचाकीस्वारांना टँकरने चिरडले
- ‘घरी कडी लावून बसलेल्यांना रिकामटेकडा म्हणतात’, भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

