Share

शिवसेनेचा विरोध मावळला मात्र, मातृ-पितृ पूजन कायम

Published On: 

औरंगाबाद : मधल्या काळात व्हॅलेंटाईन डेला विरोध करणारी शिवसेना, आता मधल्या काही काळापासून विरोध न दर्शवता, मातृ-पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करत आहे. आधी आक्रमकतेने विरोध करणाऱ्या शिवसेनेचा व्हॅलेंटाईन डेचा विरोध मावळला आहे.

यंदाही १४ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या वतीने ज्योतीनगर मधील कवितेच्या बागेत सायंकाळी ५ वाजता मातृ-पितृ पुजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मूळ विधीवत, शास्त्रोक्त पद्धतीने वेदपठणाच्या मंत्रोच्चारात आप-आपल्या माता-पित्यांचे पूजन करण्यात येणार आहे. असे कार्यक्रमाचे संयोजक आमदार अंबादास दानवे यांनी कळवले आहे.

आजकालची तरुण पिढी पाश्चिमात्य संस्कृतीचे अवलोकन करत व्हॅलेंटाईन डे सारखे पाश्चिमात्य सण साजरा करताना दिसतात. या पाश्चिमात्य संस्कृतीला फाटा देत तरुण पिढीला भारतीय संस्कृतीची, संस्कारांची ओळख व्हावी, आपल्या खऱ्या संस्कृतीची जाण असावी. त्याचप्रमाणे माता पित्यांच्या प्रती प्रेम, माया ,निष्ठा, श्रद्धा याचे ऋण व्यक्त करण्याच्या उदात्त हेतुने या मातृ-पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार मनीषा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!