नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत थेट लढत होत असताना यात आता वंचित बहुजन आघाडीने ताकद पणाला लावली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपावरून सुरू झालेला वाद आता थेट धमकीवर पोहोचला आहे. भाजप नेत्यांपाठोपाठ आता प्रकाश आंबेडकर यांनीही काँग्रेस नेते तथा मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘एक मोर्चा हायकोर्टावर गेला की तुम्ही दडवलेली फाईल पुन्हा बाहेर येईल आणि सुशीलकुमार शिंदेनाही जेलमध्ये घेऊन जाल’ असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती प्रहार केला. ‘आदर्श प्रकरण पुन्हा काढायचे का? अशी धमकी त्यांनी उघडपणे अशोक चव्हाणांना दिली.
वंचित बहुजन आघाडीबाबत अशोक चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रत्यूत्तर दिले आहे. ‘अशोकराव बोलले वंचितच्या गाडीत पेट्रोल बीजेपी भरते. अशोकराव ही चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका. निवडणूका होऊ द्या. आमच्या गाडीमध्ये कुणी पेट्रोल भरलं हे आम्ही हायकोर्टाला विचारतो की आदर्श प्रकरणात कुणाकुणाचा फ्लॅट आहे. अशोक चव्हाणांनी बायको बरोबर आणि सासूबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरावावे. एक मोर्चा हायकोर्टावर गेला की तुम्ही दडवलेली फाईल पुन्हा बाहेर येईल आणि सुशीलकुमार शिंदेनाही जेलमध्ये घेऊन जाल’ असा इशाराच प्रकाश आंबेडकरांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ
- ‘आर्यनविरोधात कट रचला जातोय, त्याची अटक चुकीची’; रोहतगींचा न्यायालयात युक्तीवाद
- नाइट सूट’मध्ये करवा चौथ साजरा; रवीना टंडनचे फोटो व्हायरल
- महत्त्वाचा निर्णय! रेशन धान्यांसाठी यापुढे कोरोना लसीकरण सक्तीचे
- महिलांना ‘मिनी ट्रॅक्टर’ कधी मिळणार? समाजकल्याण विभागाला निधीची प्रतिक्षा

