मुक्ताईनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थकांचा पक्ष सोडून योग्य निर्णय घ्यावा, अशा मागणीचा सूर वाढत आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांनी खडसेंची भेट घेतल्यानंतर खडसेंच्या पक्षप्रवेशावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात होतं. एकनाथ खडसेंसाठी मंत्रिपद व आमदारकी यासाठी चाचपणी देखील पूर्ण झाली असून लवकरच खडसे आपल्या सर्मथकांसह राष्ट्रवादी प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.
मुक्ताईनगरमध्ये भाजपचं चिन्ह हटवून नाथाभाऊंच्या समर्थनार्थ कर ण्यात आलेली बॅनरबाजी चर्चेत असतानाच एक मोठी घटना राजकीय क्षेत्रासंबंधी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल संध्याकाळी ६ वाजता देशासाठी संदेश दिला. यावेळी त्यांनी कोरोनाचं युद्ध अजून संपलं नसून लस येईपर्यंत बेफिकिरी करू नका, असं आवाहन जनतेला करतानाच येणाऱ्या सर्वधर्मीय सणांच्या शुभेच्छा देखील दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्यासह विरोधकांनी मोदींच्या या भाषणावर जोरदार निशाणा साधला आहे. यानंतर, एक खळबळजनक गोष्ट सर्वाना पाहायला मिळाली आहे. यानंतर पाटलांनी मोदींवर ट्विटद्वारे टीका केल्यानंतर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी चक्क ते ट्विट रिट्विट करून मोदींवरील टीकेला समर्थन दिलं आहे. त्यामुळे नाराज खडसे लवकरच भाजपला रामराम ठोकण्यावर एक एक पाऊल टाकत असल्याचं दिसून येत आहे.

जयंत पाटलांचा मोदींवर घणाघात –
भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील… कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील… अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही असे मत ट्वीट करत मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर व्यक्त केले आहे.
मुक्ताईनगरमध्ये बॅनरबाजी!
एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरवरुन कमळ गायब केलं आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरात समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. “नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण” असे बॅनर समर्थकांनी झळकावले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- ‘मी या वयात इतकं फिरतोय, तू किमान बाहेर तरी पड…’ असं पवारांना म्हणायचं असेल : पाटील
- एमआयएम-वंचितला खिंडार,असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश
- पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील
- सरकारवर टिका करण्यापेक्षा केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी जोर लावा ! ; थोरातांचा भाजप नेत्यांना टोला
- मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ? ; फडणवीस उत्तर द्या : अमोल मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

