हुबळी : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएएस येडियुरप्पा यांच्या गच्छंतीबाबतची वृत्तं अधूनमधून माध्यमांमध्ये झळकत असतात. मात्र असे असले तरी येडियुरप्पा यांनी आतापर्यंत तरी आपल्या पदावर गदा येऊ दिलेली नाहीये. कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या विषयावर अखेर मुख्यमंत्री बीएस येडियुराप्पा यांनी मौन सोडले आहे. आज त्यांनी, राज्यातील नेतृत्वबदलाबाबतच्या चर्चांबाबत मोठे विधान केले आहे.
भाजपा हायकमांडचा विश्वास असेल तोपर्यंत मुख्यमंत्रीपदी राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय नेतृत्त्वाने आदेश देताच मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘दिल्लीतील हायकमांडचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदी काम करणार नाही. ते सांगतील त्याच दिवशी राजीनामा देईन आणि राज्याच्या विकासासाठी दिवस-रात्र काम करत राहे. मला कोणताही भ्रम नाही. मला हायकमांड ने एक संधी दिली आहे. मी त्या संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहे. बाकी सर्व गोष्टी मी हायकमांडवर सोडल्या आहेत.’ असे येडियुराप्पा यांनी या विषयावर पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री आर अशोक यांनी देखील राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चा थांबवायला हव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले कि, ‘बीएस येडियुरप्पा हे आमचे नेते आहेत आणि तेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. त्यामुळे राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चा आता थांबवायला हव्यात’. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बेकायदेशीर मोबाईल टॉवर प्रकरणी जागरुक नागरिकांनी तक्रार करताच मनपास आली जाग!
- राष्ट्रपतींचे ट्विट हटवल्याने ‘या’ देशात ट्विटरवर बंदी, भारतासोबतही ट्विटरचा वाद सुरू
- बीडमध्ये मराठा आरक्षण मोर्चा; आ.मेटेंसह तीन हजार जणांवर गुन्हा दाखल
- ‘मोदी सरकार श्रेय घेण्यात गुंतल्याने देशात कोरोनाचे संकट गडद’
- ‘सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करा’, शिवसेना खासदाराचे ‘महाबीज’ला पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

